आम आदमी विमा योजना

आम आदमी विमा योजना

आम आदमी विमा योजना

योजनेचा प्रकार

केंद्र पुरस्कृत योजना

योजनेचा उददेश

विमा संरक्षण व शिष्यवृत्ती

योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव

सर्व प्रवर्गातील व्यक्तींना लागू आहे.

योजनेच्या प्रमुख अटी

ग्रामीण भागातील 18 ते 59 वयोगटातील भूमिहीन शेतमजूरांना तसेच 2.5 एकर पेक्षा कमी बागायती व 5 एकर पेक्षा कमी जिरायती शेतजमीन धारण करणाऱ्यांना या योजनेंतर्गत लाभ देण्यात येतो. वार्षिक विम्याचा हप्ता रु.200/- इतका असून केंद्र शासनामार्फत रु.100/- व राज्य शासनामार्फत रु.100/- इतका विम्याचा हप्ता भारतीय आयुर्विमा महामंडळाला देण्यात येतो.

दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप

या योजनेंतर्गत खालीलप्रमाणे घटना घडल्यास लाभार्थ्यांच्या वारसास / लाभार्थ्यास रक्कम देण्यात येते.

  • नैसर्गिक मृत्यू – रु. 30,000/-
  • अपघाती मृत्यू – रु.75, 000/-
  • अपघातामुळे कायमचे अपंग – रु.75, 000/-
  • अपघातामुळे दोन्ही डोळे वा दोन्ही पाय गमावल्यास – रु.75, 000/-
  • अपघातामुळे एक डोळा वा एक पाय गमावल्यास – रु.37, 500/-

या योजनेंतर्गत लाभार्थ्याच्या नववी ते बारावी इयत्तेत शिकणाऱ्या दोन मुलांना रु.100/- प्रतिमहा प्रति विद्यार्थी शिष्यवृत्ती देण्यात येते.

👉गोपीनाथ मुंडे शेतकरी आपघात सुरक्षा योजना

अर्ज करण्याची पध्दत

अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो

योजनेची वर्गवारी

विमा संरक्षण व शिष्यवृत्ती

संपर्क कार्यालयाचे नाव

जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय

अ क्र वर्ष खर्च रुपये लाखात लाभार्थी
1 2012-13 3397 3660970
2 2013-14 2061 4950193
3 2014-15 2664 5323006

 

👉सन्मान धन योजना मराठी : घरेलू कामगारांना मिळणार 10000 रुपये
👉महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
👉राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती
👉मोफत रेशन 5 वर्षे सुरू राहणार,
👉81 कोटी लोकांना होणार फायदा, मंत्रिमंडळाची मंजुरी

Leave a Comment