श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना

 https://sarkarisevaa.com/shravanbal-seva-…ावणबाळ-सेवा-राज्/

“श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना,” जी महाराष्ट्र, भारत सरकारने सुरू केलेली एक कल्याणकारी कार्यक्रम आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकारमध्ये सेवा केलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते.

योजनेचा प्रकार

राज्य पुरस्कृत योजना

राज्य पुरस्कृत योजना

राज्यातील निराधार व्यक्तीना दरमहा निवृत्तीवेतन

योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव

सर्व प्रवर्गातील व्यक्तींना लागू आहे.

योजनेच्या प्रमुख अटी

(अ) :-65 व 65 वर्षावरील व दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव समाविष्ट असणाऱ्याव्यक्तीना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना गट (अ) मधून रु.400/- प्रतिमहिना निवृत्तीवेतन देण्यात येते याच लाभार्थ्याला केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेचे रु.200/- प्रतिमहा प्रति लाभार्थी निवृत्तीवेतन दिले जाते. यामुळे या लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून रु.400/- प्रतिमहा व केंद्र शासनाकडून रु.200/- प्रतिमहाअसे एकूण रु.600/- प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन मिळते.

(ब):-या योजनेतंर्गत ज्या व्यक्तीचे वय 65 व 65 वर्षावरील आहे व ज्यांचे कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न रुपये 21,000/- च्या आत आहे, अशा वृध्दांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना (गट- ब) मध्ये रुपये 600/- प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन राज्य शासनाकडून देण्यात येते.

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना

दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप

प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन रु.600/- अदा करण्यात येते.

अर्ज करण्याची पध्दत

अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो

योजनेची वर्गवारी

निवृत्तीवेतन

संपर्क कार्यालयाचे नाव

जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय

कार्यालयाचे नाव – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्राालय, मुंबई.
अ क्र वर्ष खर्चरुपये लाखात लाभार्थी
1 2012-13 ६६१२२ १३५४३८१
2 2013-14 ९०७१३ १५२६४५२
3 2014-15 ९८३११ १८६०११०

 

मोफत रेशन 5 वर्षे सुरू राहणार, 81 कोटी लोकांना होणार फायदा, मंत्रिमंडळाची मंजुरी
उज्ज्वला एलपीजी सिलेंडर: 600 रुपयांमध्ये
म्हाडा लॉटरी 2024: नोंदणी, अर्ज, लॉटरीच्या तारखा
आयुष्मान सहकार योजना २०२३: ऑनलाईन नोंदणी, (सहकार योजना) लाभ आणि उद्दिष्ट

Leave a Comment