पूर्वीच्या उतारे,सातबारा आणि जुने फेरफार पहा दोन मिनिटात

पूर्वीच्या उतारे,सातबारा आणि जुने फेरफार पहा दोन मिनिटात
पूर्वीच्या उतारे,सातबारा आणि जुने फेरफार पहा दोन मिनिटात

जर तुम्हाला जमिनीबद्दलचे तुमचे ज्ञान वाढवायचे असेल, तर त्याच्या मूळ मालकीसह आणि कालांतराने झालेल्या कोणत्याही बदलांसह त्याच्या इतिहासाची माहिती असणे महत्त्वाचे आहे. ही माहिती सातबारा, फरार, तहसीलमधील खाते उतारा आणि 1880 च्या भूमी अभिलेख कार्यालयांद्वारे मिळू शकते. अलीकडेच, सरकारने ही माहिती ऑनलाइन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे, जी पूर्वी केवळ 7 जिल्ह्यांपुरती मर्यादित होती. मात्र, ही सेवा आता राज्यभरातील 19 जिल्ह्यांमध्ये विस्तारली आहे.WhatsApp Main Page

अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, लातूर, मुंबई उपनगरे, नंदुरबार, या जिल्ह्यांसह सुमारे 30 कोटी जुन्या अभिलेखांच्या अर्कांपर्यंत ई-रेकॉर्ड कार्यक्रमाद्वारे प्रवेश देण्याची महाराष्ट्र सरकारची योजना आहे. नाशिक, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, वाशीम आणि यवतमाळ.

पूर्वीच्या उतारे,सातबारा आणि जुने फेरफार पहा?

 1. सगळ्यात आधी तुम्हाला “https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/” असं सर्च करावं लागेल.
 2. त्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल.
 3. इथं “e-Records (Archived Documents)” या नावाचं एक पेज तुम्हाला दिसेल.
 4. या पेजवर उजवीकडील भाषा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही मराठी भाषा निवडू शकता.
 5. तुम्ही जर आधीच या वेबसाईटवर नोंदणी केली असेल, तर लॉग-इन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही या साईटवरील सेवांचा लाभ घेऊ शकता.
 6. पण, जर तुम्ही पहिल्यांदाच इथं आला असेल, तर सगळ्यांनी अगोदर तुम्हाला इथं नवीन वापरकर्ता नोंदणी या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
 7. एकदा का तुम्ही इथं क्लिक केलं की एक नवीन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल. यामध्ये तुम्हाला सुरुवातीला वैयक्तिक माहिती द्यायची आहे.
 8. यामध्ये तुमचं नाव, मधलं नाव आणि आडनाव. त्यानंतर जेंडर (मेल आहे की फिमेल), नॅशनलिटी म्हणजेच राष्ट्रीयत्व, त्यानंतर मोबाईल नंबर द्यायचा आहे.
 9. त्यानंतर तुम्ही व्यवसाय काय करता ते सांगायचं आहे, जसं की व्यापार, सेवा कि इतर म्हणजे वेगळं काही करता ते सांगायचं आहे.
 10. यानंतर मेल-आयडी आणि जन्मतारीख लिहायची आहे.
 11. वैयक्तिक माहिती भरून झाल्यानंतर पत्त्याविषयीची माहिती सांगायची आहे.
 12. यामध्ये घर क्रमांक, मजला क्रमांक (कितव्या मजल्यावर राहता), इमारत किंवा घरावर काही नाव असेल तर ते लिहायचं आहे.
 13. त्यानंतर Pincode टाकायचा आहे. पिन कोड टाकला की जिल्हा आणि राज्याचं नाव आपोआप फॉर्मवर येऊन जातं.
 14. पुढे गल्लीचं नाव, गावाचं नाव आणि तालुक्याचं नाव टाकायचं आहे.
 15. ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन -आयडी तयार करायचा आहे.
 16. तो जर नसेल, तर त्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं. ४ ते ५ प्रश्न असतात, सोपे असतात, त्यापैकी एकाचं उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर Captcha टाईप करायचा आहे. म्हणजे इथं दिसणारे आकडे किंवा अक्षरं पुढच्या कप्प्यात जशाच्या तसे लिहायचे आहेत.

याप्रमाणे, तुम्हाला इथं उपलब्ध असलेले जुने अभिलेख मिळवण्याची सोपी पद्धत आहे.

घरकुल योजनेची यादी जाहीर, गावानुसार यादीत नाव तपासा मोबाईलवर
गावानुसार नवीन मतदार यादी आपले नाव चेक करा
कुसुम सौर पंप योजना 2024 साठी अर्ज कसा करता येईल आणि सौर पंप कोटा कसा पडताळता येईल?
Aadhar Card Update: तुमचं आधार मोफत आता अपडेट करा तेही घरबसल्या

Leave a Comment