pvc पाईप लाईन अनुदान योजना
राज्य सरकारने राज्यातील जमिनी जलसिंचनाच्या खाली आणण्यासाठी वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत त्यामध्ये ही एक योजना आहे. आपल्याला तर माहित आहे की आपल्या शेतामध्ये ठीक ठिकाणी किंवा सर्व शेतातील पिकांना जर पाणी द्यायचं असेल तर आपल्याला पीव्हीसी पाईप ची गरज भासते पण काही शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीमुळे ते खरेदी करू शकत नाही
त्यामुळे सरकारने पीव्हीसी पाईप योजना आणली आहे या योजनेद्वारे
पीव्हीसी पाईपच्या खरेदीवर 50% अनुदान व जास्तीत जास्त 15 हजाराचा लाभ आपण घेऊ शकतो
या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता, तर यासाठी काही अटी पाहूया
अर्जदाराकडे शेत जमीन असावी
शेतकऱ्याकडे बँक खाते असावे ते आधार कार्ड वर लिंक असावे
पीव्हीसी पाईप्साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा, , खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
अर्ज करा
आवश्यक कागदपत्रे
-
७/१२ प्रमाणपत्र
-
८-ए प्रमाणपत्र
-
वीज बिल
-
खरेदी केलेल्या संचाचे बिल
-
पूर्वसंमती पत्र
-
आधार कार्ड
-
बँक पासबुक