सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, वैशिष्टेय व पात्रता

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, वैशिष्टेय व पात्रता

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, वैशिष्टेय व पात्रता

सावित्रीबाई फुले शिष्‍यवृत्‍तीसाठी अटी

Table of Contents

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, अनुदानित,विनानुदानित, माध्यमिक शाळेतील इ.८ वी ते इ. १० वी च्या मुलींसाठी असून ती गुणवत्ता शिष्यवृत्ती व्यतिरिक्त राहील. यासाठी मागासवर्गीय मुलींना उत्पन्नाची अट राहणार नाही. परंतु शाळेतील उपस्थिती नियमित असणे आवश्यक आहे. उपस्थितीनुसार शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीसाठी मुलींना अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा उद्देश –

शासन निर्णय दिनांक १२ जानेवारी, १९९६ अन्वये मागास समाजातील विद्यार्थिनींसाठी व शासन निर्णय दिनांक २९ ऑक्टोबर, १९९६ पासून विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थींनींना सुध्दा लागू करण्यात आली आहे. सदर प्रवर्गाच्या विद्यार्थींनींचे गळतीचे प्रमाण कमी करण्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ही शिष्यवृत्ती दिली जाते.

मागासवर्गीय समाजातील मुलींच्या शिक्षणातील गळतीचा प्रमाण निश्चित करण्याच्या हेतूने, १९९५-९६ पासून शिष्यवृत्तीची योजना सुरू केली गेली. या योजनेमुळे गावातील दलित मुलींना प्रत्येक शैक्षणिक वर्षात जून ते मार्च अशी दहा महिन्यांसाठी रुपये १००/- प्रमाणे शिष्यवृत्ती दिली जाते. त्या मुलींनी ज्या घरात म्हणजे ओझे विचारले जाते, त्या घरात आता न्याय मिळणार नाही.

या शिष्यवृत्तीचा उद्देश शिक्षणातील गळती कमी करण्याचा आहे. या योजनेमुळे मुलींचे सक्षमीकरण होईल. शिक्षणातील गळतीच्या नियंत्रणात आणण्याचा हा अभिप्राय असतो. या प्रक्रियेमध्ये अटी असणार नाही. परंतु, शाळेतील उपस्थिती नियमित असावी आणि उपस्थितीच्या आधारे शिष्यवृत्ती दिली जाते.

योजनेच्या प्रमुख अटी
विद्यार्थीनी विजाभज / विमाप्र या प्रवर्गातील असावी.
विद्यार्थीनी इ. ५ वी ते ७ वी मध्ये शिकणारी असावी.
विद्यार्थीनी ही शासन मान्य शाळेत नियमित शिकणारी असावी.

नियम, अटी व पात्रता इ. :
उत्पन्न व गुणाची अट नाही.
संबंधित शाळेच्या मुख्याणद्यापकांनी विद्यार्थ्यांबचे अर्ज ऑनलाईन भरणे आवश्येक.
७५% उपस्थिती असल्यास शाळेने प्रस्ताव विहीत कालावधीत सादर करावा.
लाभधारक मुलगी शासनमान्य शिक्षण संस्थेत नियमित शिकत असावी. सदर शिष्यवृत्तीची रक्कम त्या त्या मुलींच्या बँकेतील खात्यामध्ये/ ऑनलाईन जमा करण्याषत येते.

संपर्क कार्यालयाचे नाव
संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद.
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/ उपनगर.
संबंधित शाळांचे मुख्याध्यापक.

Leave a Comment