सरकारी योजना महाराष्ट्र 2024 : विविध सरकारी योजनांची माहिती

                        सरकारी योजना महाराष्ट्र 2024 : विविध सरकारी योजनांची माहिती

                                                                                                                                      महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वायोश्री योजना

सरकारी योजना महाराष्ट्र 2024 : विविध सरकारी योजनांची माहिती

1) वसंतराव नाईक कर्ज योजना 2024

सरकारी योजना महाराष्ट्र 2024 : केंद्र शासनाच्या माध्यमातून किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून देशातील किंवा राज्यातील जनतेसाठी विविध लोककल्याणकारी योजना राबविल्या जातात. त्यामध्ये असणारी एक महत्त्वाची योजना म्हणजे वसंतराव नाईक कर्ज योजना.
अनुक्रमणिका
सरकारी योजना महाराष्ट्र २०२४ : विविध सरकारी योजनांची माहिती
१) वसंतराव कर्ज योजना २०२४
२) शेळी वढी पालन तसेच गाय व म्हैस पालन योजना
3. शबरी घरकुल योजना 2024
४) महाज्योती प्रीटॅबलेट योजना २०२४
५. अण्णासाहेब पाटील कर्ज योजना २०२४
६) मधमाशी केंद्र योजना
७) सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
8) आंतरजातीय विवाह योजना 2024
9) आरोग्य योजना योजना 2024
देशातील आणि राज्यातील बेरोजगार युवकांची संख्या लक्षात घेऊन राज्य शासनाच्या माध्यमातून तरुणांना व्यवसाय करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून वसंतराव नाईक भटक्या जमाती विमुक्त जाती विकास महामंडळामार्फत या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. राज्यातील प्रत्येक तरुणांना महाराष्ट्र सरकारला शक्य नसल्यामुळे तसेच महाराष्ट्र राज्यातील उद्योगधंदे वाढीसाठी राज्यातील तरुणांना व्यवसायामध्ये उतरवण्यासाठी प्रयत्न करणे हेतूने राज्य शासनाच्या माध्यमातून योजनेचे सुरुवात करण्यात आलेली आहे. राज्यातील जे बेरोजगार युवक आहेत त्यांना आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्या तरुणांना महामंडळामार्फत थेट कर्ज दिले जाते. सरकारी योजना महाराष्ट्र 2024
वसंतराव नाईक कर्ज योजना 2024 अधिक माहितीसाठी

2) शेळी व मेंढी पालन तसेच गाय व म्हैस पालन योजना

शेळी पालन योजना

राज्य शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेळी मेंढी पालन व गाय म्हैस पालन योजना सुरू केलेली आहे. सदर योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागातर्फे दुधाळ गाई आणि म्हशी वाटप करण्यात येणार आहेत. तसेच शेळी आणि मेंढी गट वाटप सुद्धा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शेतीला जोडधंदा म्हणून कुकट पालन व्यवसाय करण्यासाठी 1000 पक्षांचे वाटप देखील करण्यात येणार आहे.
शेळी व मेंढी पालन तसेच गाय व म्हैस पालन योजना अधिक माहितीसाठी

3. शबरी घरकुल योजना 2024

महाराष्ट्र राज्यातील बहुतांशी अनुसूचित जमातीच्या लोकांना अजून सुद्धा राहण्यासाठी स्वतःची घरे उपलब्ध नाहीत. माती पासून तयार केलेल्या झोपड्या मध्ये आज देखील या समाजाचे लोक वास्तव्य करत आहेत. त्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी ऊन, वारा, पाऊस यासारख्या अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते, या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना स्वतःचे घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी शबरी घरकुल योजनेचे सुरुवात केलेली आहे. सरकारी योजना महाराष्ट्र 2024
शबरी घरकुल योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जमातीमधील अर्जदार लाभार्थी कुटुंबाला 269 चौरस क्षेत्र असलेले पक्के घरकुल उपलब्ध करून दिले जाते. तसेच त्या कुटुंबामध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधण्यासाठी देखील आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. शबरी घरकुल योजनेच्या माध्यमातून राज्यामध्ये वास्तव्य करत असणारे आदिवासी जमातीच्या कुटुंबाला, तसेच पारधी समाज कुटुंबांना, विधवा महिला निराधार कुटुंब, दुर्गम व अति डोंगराळ भागातील कुटुंबांना सर्वात प्रथम प्राधान्य देण्यात येते. तसेच या योजनेच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना 5% आरक्षण देखील देण्यात येते. दिव्यांग महिलांना देखील या योजनेत सर्वात प्रथम प्राधान्य देण्यात येते.
शबरी घरकुल योजना 2024 अधिक माहितीसाठी

4) महाज्योती प्री टॅबलेट योजना 2024

सरकारी योजना महाराष्ट्र 2024 : राज्य शासनाच्या माध्यमातून नेहमी विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात, राज्यातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये तसेच शिक्षण घेत असताना कोणत्याही प्रकारच्या त्या विद्यार्थ्याला अडचणी येऊ नये या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र शासनाने महाज्योती फ्री टॅबलेट योजना सुरू केलेली आहे. सरकारी योजना महाराष्ट्र 2024
इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी व विविध क्षेत्रांमध्ये करिअर करण्यासाठी प्रवेश घेत असतात, अनेक विद्यार्थी हे महागडे कोचिंग क्लासेस लावतात व शिक्षण घेतात परंतु राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना इंजिनियर, मेडिकल साठी तयारी करायची असते परंतु आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना त्या क्षेत्रामध्ये प्रवेश घेता येत नाही. तसेच त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अनेक ऑनलाईन कोचिंग क्लासेस प्रशिक्षण केंद्र आहेत. त्यामुळे विध्यार्थ्यांना टॅबलेटच्या माध्यमातून ऑनलाइन च्या माध्यमातून प्रशिक्षण घेता येणार आहे. त्यासाठी हा राज्य शासनाने उपक्रम राबवलेला आहे.
महाज्योती प्री टॅबलेट योजना 2024 अधिक माहितीसाठी

5. अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2024

महाराष्ट्र राज्यातील बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. प्रत्येक वर्षी लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत. परंतु प्रत्येकाला नोकरी देणे राज्य शासनाला शक्य नसल्यामुळे राज्यांमध्ये बेरोजगारांची संख्या ही तितकीच झपाट्याने वाढत चाललेली आहे. हीच गोष्ट महाराष्ट्र शासनाने लक्षात घेऊन महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाते. सरकारी योजना महाराष्ट्र 2024
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित कुशल तरुणांना स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा सुरू असलेले व्यवसाय मध्ये वाढ करायची असल्यास त्या तरुणांना 10 ते 50 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज पुरवठा करण्यात येतो. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 08 लाखापेक्षा कमी हे अशा कुटुंबातील व्यक्तींना 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मंजूर केली जाते. तसेच कर्जाचे हप्ते अर्जदारांनी वेळेत भरले तर अर्जदाराला कोणत्याही व्याजाचे रक्कम भरण्याची आवश्यकता राहत नाही. संपूर्ण कर्ज हे बिनव्याचे दिले जाते. सरकारी योजना महाराष्ट्र 2024
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2024 अधिक माहितीसाठी

6) मधमाशी केंद्र योजना

महाराष्ट्र राज्या मध्ये पाहायला गेले तर जवळपास 70% लोक शेती व्यवसायावरती अवलंबून आहेत. परंतु दुष्काळ, नैसर्गिक वादळ, अनियमित पडणारा पाऊस, रोगराई बाजारभाव, यासारख्या अनेक घटना मुळे शेतकरी नेहमी तोट्यात जाताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे शेतकऱ्याला शेतीबरोबरच शेती संलग्न जोड व्यवसाय असावा जेणेकरून त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल.
आपल्याला माहीतच असेल की मधमाश्यामुळे शेती उत्पादनात फार मोठ्या प्रमाणावर वाढ होते, व हा व्यवसाय शेतकरी सहजरित्या करू शकतो, त्यामुळे शासनाच्या माध्यमातून असे सांगितले जाते की मधमाशीपालन हा उद्योग शेतीला जोडधंदा म्हणून वेतन मुख्य व्यवसाय म्हणून मधमाशी पालन व्यवसाय करावा. त्यामुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मिती देखील होऊ शकते. मधमाशांच्या पेट्या जिथे फळबागा आहेत, व जिथे फुलांची शेती केली जाते व जवळपास जंगलात ठेवल्यास मधमाशा द्वारे पर-परागीभवन होऊन पिकांच्या उत्पादनात पिकांच्या प्रकारानुसार 10% ते 40% पर्यंत पिकाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता असते.

7) सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना

महाराष्ट्र राज्यामधील आज देखील असे काही कुटुंब आहेत की आपल्या पाल्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देऊ शकत नाहीत. त्यांच्या कुटुंबाकडे कोणतेही प्रकारचे रोजगाराचे साधन उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या गरजा देखील त्यांना भागवता येत नाहीत. अशा कुटुंबातील मुलांची व मुलींची शिकण्याची इच्छा असते परंतु आर्थिक परिस्थिती बेताचे असल्यामुळे शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते पूर्णपणे असमर्थ ठरत आहेत.  सरकारी योजना महाराष्ट्र 2024
त्यामुळे शिक्षणापासून वंचित राहतात, त्यांचा सामाजिक आर्थिक विकास देखील होत नाही, आज देखील सध्याच्या परिस्थितीमध्ये समाजामध्ये अशा अनेक मुली आहेत की, त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांना मुलांच्या शिक्षणाएवढे महत्त्व दिले जात नाही. अनेक ठिकाणी भ्रूणहत्या सारखे प्रकार देखील घडतात, त्यामुळे मुलीं शिक्षण घेऊ शकत नाहीत. इयत्ता 7वी ते इयत्ता 10वी पर्यंत शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना च्या माध्यमातून शिष्यवृत्ती दिली जाते, जेणेकरून मुलींना आर्थिक स्वरूपाची अडचण येऊ नये.

8) आंतरजातीय विवाह योजना 2024

देशामध्ये आणि राज्यांमध्ये अनेक जाती धर्माच्या लोक राहतात त्यामुळे जात-धर्म भेदभाव या गोष्टी सर्रास पाहायला मिळतात, समाजातील अस्पृश्यता नष्ट करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आंतरजातीय विवाह योजना राबवली गेली आहे. सरकारी योजना महाराष्ट्र 2024
आंतरजातीय विवाह योजनेच्या माध्यमातून विवाह करणाऱ्या पती-पत्नीस 2,50,000 हजार रुपयांची आर्थिक मदत शासनाच्या माध्यमातून केली जाते. या योजनेमध्ये अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, यापैकी एक व्यक्ती आणि दुसरी व्यक्ती हिंदू, जैन, लिंगायत, शिख या धर्माची असेल तर त्या विवाह आंतरजातीय विवाह असे समजण्यात येईल.
आंतरजातीय विवाह योजना 2024 अधिक माहितीसाठी

9) मोफत सायकल वाटप योजना 2024

महाराष्ट्र राज्यामध्ये आज देखील खेड्यापाड्यांमध्ये दुर्गम भागामध्ये वाहतुकीची साधने उपलब्ध नाहीत. रस्त्यांचा देखील विकास झालेला नाही, त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाण्यासाठी व येण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात, तसेच ग्रामीण भागातील शाळा ह्या विद्यार्थ्यांच्या घरापासून काही कोसो दूर लांब असतात, त्यामुळे विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था उपलब्ध नसते, किंवा शाळा सुटल्यानंतर मुलीला व मुलांना घरी येण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे त्यांना वाहतुकीचे साधन घेऊन देण्यासाठी कुटुंबाकडे आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे ते आपल्या पाल्यांच्या गरजा पूर्ण करू शकत नाहीत. सरकारी योजना महाराष्ट्र 2024
आर्थिक परिस्थिती नसल्या कारणाने आपल्या पाल्यांसाठी सायकल विकत घेऊ शकत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील घर आणि शाळा यामध्ये अंतरही खूप लांब असते, या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने नवीन जीआर काढून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या मुलींसाठी मोफत सायकल वाटप योजना सुरू केली आहे.
मोफत सायकल वाटप योजना 2024 सविस्तर माहितीसाठी

Leave a Comment