प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

                  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

Table of Contents

देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदीचा बातमी आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी(PM Kisan Samman Nidhi) पात्र आहेत, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता मिळण्याची तारीख ठरली आहे. येत्या मार्च 2024 रोजी म्हणजे म्हणजे पुढच्याच आठवड्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी 16 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. 
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत गरीब शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपयांची मदत केली जाते. या दर चार महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांची मदत हस्तांतरीत केली जाते.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी 5 नोव्हेंबर 2023 ला 15 वा हप्ता जमा

यापूर्वी, 15 नोव्हेंबर 2023 रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेअंतर्गत 15 वा हप्ता जारी केला होता. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार कोटींहून अधिक रक्कम जमा झाली होती.

 1 मार्च 2024 मिळणार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी 16 वा हप्ता

पीएम किसान योजनेचा 16 हप्ता 1 मार्च 2024 रोजी जारी केला जाणार आहे. या तारखेला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रोख रक्कम जमा केली जाणार आहे.पीएम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी eKYC अनिवार्य आहे. OTP आधारित ekyc  पोर्टलवर उपलब्ध आहे  किंवा बायोमेट्रिक आधारित eKYC साठी जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधा. EKYC आवश्यक आहे कारण PM किसान योजनेचे फायदे त्यांच्या आधारशी लिंक केलेल्या बँक खात्यापर्यंत कोणत्याही मध्यस्थाशिवाय पोहोचले पाहिजेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  1 मार्च 2024 रोजी राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातून हस्तांतरित केला जाणार आहे. हा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे हस्तांतरित केला जाणार आहे.

https://sarkarisevaa.com/मराठा-आरक्षण-जरांगे/

 2019 मध्ये  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती

2019 मध्ये भारत सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती. तेव्हापासून केंद्र सरकारने या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 15 हप्ते जारी केले आहेत. योजनेअंतर्गत, भारत सरकार वर्षातून तीन वेळा  2000 चे तीन हप्ते जारी करते. म्हणजे एका वर्षात  6000 दिले जातात. आता शेतकऱ्यांना 16 व्या हप्त्याची प्रतीक्षा होती. पण आता 16 व्या हप्त्याची तारीख देखील निश्चित झाली आहे  1 मार्च 2024 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी 16 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीआतापर्यंत खात्यात 2.8 लाख कोटी

मोदी सरकारने 2019 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीपर्वी पीएम किसान योजनेची घोषणा केली होती. मार्च महिन्यात पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात 15 हप्त्यांच्या माध्यमातून 2.8 लाख कोटी रुपये जमा केले आहेत.

1 मार्च 2024 : राज्यातील शेतकऱ्यांना अवकाळीने पुन्हा फटका दिला. गारपीटीने हातातोंडाशी आलेले पीक गेले. विदर्भासह मराठवाडा आणि राज्यातील इतर भागात नुकसान झाले. दरम्यान शेतकऱ्यांना आज पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा [प्रधानमंत्री किसान सन्मान निधी]लाभ मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळ दौऱ्यावर आहेत. यवतमाळ-नागपूर रस्त्यावरील भारी येथे त्यांचा कार्यक्रम आहे. याठिकाणी ते कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा हप्ता जमा करतील. पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता जमा होणार आहे. आज तुमच्या बँक खात्याचे बॅलन्स नक्की तापासा.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत आतापर्यंत 14 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. या योजनेअंतर्गत 2 हेक्टरपर्यंत शेती करणाऱ्या शेतकरी मालकांना या योजनेचा लाभ मिळतो.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतकुटुंबातील सर्व सदस्यांना लाभ मिळतो?                                                पीएम किसान योजनेचे नियम खूप कडक आहेत. लोकांच्या मनात प्रश्न पडत राहतात की एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळू शकतात? कुटुंबातील एका सदस्यालाच पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. कुटुंबातील इतर सदस्य या योजनेचा लाभ घेताना आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई होऊ शकते. एवढेच नाही तर त्यांच्याकडून पैसेही काढून घेता येतात. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते लाभार्थ्यांच्या आधारशी जोडलेल्या डेटाबेसच्या मदतीने जारी केले जातात. या डेटाबेसमध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती असते.

  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी असा करा अर्ज

 • pmkisan.gov.in या साईटवर जाऊन प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेता येईल
 • ‘किसान कॉर्नर’ पर्यायावर क्लिक करा
 • ‘न्यू किसान रजिस्ट्रेशन’ हा पर्याय निवडा
 • तुमचे शहर अथवा गावाची निवड करा
 • आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, आणि राज्याची निवड करा
 • ‘गेट ओटीपी’ वर क्लिक करा
 • ओटीपी नोंदवून नोंदणीची पुढील प्रक्रिया करा
 • नाव, राज्य, जिल्हा, बँक आणि आधारचा तपशील अशी सर्व माहिती भरा
 • आधार प्रामाणिकरण करुन अर्ज जमा करा
 • शेतीसंबंधीची माहिती जमा करा
 • सेव्ह बटणावर क्लिक करा
 • नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्याचा मॅसेज येईल

Leave a Comment