पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी 50 टक्के सबसिडीवर 50 लाखापर्यंत कर्ज कसं मिळवाल?

Table of Contents

पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी 50 टक्के सबसिडीवर 50 लाखापर्यंत कर्ज कसं मिळवाल?

पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी 50 टक्के सबसिडीवर 50 लाखापर्यंत कर्ज कसं मिळवाल?
ग्रामीण भागात पोल्ट्री फार्म विकसित करण्यासाठी सरकारकडून ५० लाखांपर्यंत कर्ज दिलं जाईल. यावर ५० टक्के सब्सिडी मिळेल.
उदाहरणार्थ जर तुम्ही ५० लाखाचं कर्ज घेतलं तर तुम्हाला २५ लाख परत करावे लागतील. पण हे पैसे त्या संबधित बँकेत दोन हफ्त्यांत जमा करावे लागतील.
कर्ज कोणाला मिळू शकतं?
या योजनेअंतर्गत कोणी व्यक्ती, बचत गट, उद्योजक, शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था, कंपनी कायद्याच्या कलम ८ अंतर्गत स्थापन झालेल्या संस्था कोणाही कर्ज मिळवू शकतं.
या योजनेसाठी कोणतीही राष्ट्रीयकृत बँक कर्ज देते.

पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी अर्ज कसा करायचा?

या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. यासाठी सरकारने खास राष्ट्रीय पाळीव पशू मिशन पोर्टल (नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन पोर्टल) काढलं आहे.

कोंबडीफोटो स्रोत,GETTY IMAGES
कर्ज घेणाऱ्याच्या नावावर कमीत कमी एक एकर शेतजमीन हवी. यासंबंधित कागदपत्र अर्जाला जोडलेली हवी. जर तुमची स्वतःची जमीन नसेल तर लीजवर घेतलेल्या जमिनीवरही कर्ज घेता येतं पण अशा वेळेस हे कर्ज तुम्ही आणि जमीन मालक दोघांच्या नावाने दिलं जातं.

या योजनेअंतर्गत कर्ज घेण्याआधी एक सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करावा लागतो. पोल्ट्री फार्मची योजना काय आहे हे यात विशद करावं लागतं आणि ऑनलाईन तो फॉर्म पोर्टलवर अपलोड करावा लागतो.

पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी कर्ज कोणाला मिळू शकतं?

या योजनेअंतर्गत कोणी व्यक्ती, बचत गट, उद्योजक, शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था, कंपनी कायद्याच्या कलम 8 अंतर्गत स्थापन झालेल्या संस्था कोणाही कर्ज मिळवू शकतं.

या योजनेसाठी कोणतीही राष्ट्रीयकृत बँक कर्ज देते.

पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी कोणती कागदपत्रं लागतात?

सविस्तर प्रकल्प अहवाल
– आधार कार्ड
– पोल्ट्री फार्म उभं करायचं आहे त्या जागेचे फोटो
– जमिनीची कागदपत्रं
– पॅन कार्ड
– मतदान ओळखपत्र
– ज्या बँकेतून कर्ज घ्यायचं आहे त्या बँकेत असलेल्या तुमच्या खात्य

ाचे दोन कॅन्सल चेक
– रहिवासी दाखला
– आवश्यक फॉर्म
– जात प्रमाणपत्र (गरजेचे असल्यास)
– कौशल्य प्रमाणपत्रं
– स्कॅन सही

एकदा कागदपत्रांची जुळवाजुळव झाली की नॅशनल लाईव्हस्टॉक पोर्टलवर जाऊन आपला यूझर आयडी आणि पासवर्ड बनवावा. त्यासाठी  या पोर्टलला भेट द्यावी.

तुमचा अर्ज कोणत्या पायरीवर आहे याची माहिती तुम्हाला याच पोर्टलवर मिळेल.

पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी अर्ज करताना काय काळजी घ्यावी?

तुम्ही लॉगिन करण्याचा प्रयत्न केल्यावर तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल. आपली सगळी कागदपत्रं नीट असावीत ही काळजी घ्यावी. तसंच नक्की किती कर्ज हवं आहे हे अर्ज करतानाच नमूद करावं.

पोल्ट्रूीफोटो स्रोत,GETTY IMAGES
तुमचा प्रकल्प अहवाल सर्वात महत्त्वाचा आहे. यात तुम्हाला नेमक्या किती कोंबड्या पाळायच्या आहेत,त्यांच्या पालनासाठी किती खर्च येणार, त्यांना खाऊपिऊ घालण्याचा खर्च किती हे सगळं नीट नमूद केलेलं असावं. सगळी माहिती खरी असावी.

सिबील स्कोर चांगला असणं आवश्यक आहे का?

होय, या योजनेअंतर्गत कर्ज घ्यायचे असल्यास तुमचा सिबील स्कोर चांगला असणं आवश्यक आहे. तो चांगला नसल्यास बँका कर्ज देणार नाहीत.

पडताळणी दरम्यान कोणतीही माहिती खोटी किंवा संशयास्पद आढळली तर अर्ज रद्द होऊ शकतो.

सिबील स्कोर चांगला असणं आवश्यक आहे का?

होय, या योजनेअंतर्गत कर्ज घ्यायचे असल्यास तुमचा सिबील स्कोर चांगला असणं आवश्यक आहे. तो चांगला नसल्यास बँका कर्ज देणार नाहीत.

पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता?

कुक्कुटपालन हा व्यवसाय जोखमीचा आहे. त्यामुळे या व्यवसायात उतरताना प्रशिक्षण असणं अत्यंत आवश्यक ठरतं.

कोंबड्यांची निगा कशी राखावी, त्यांना रोगापासून कसं दूर ठेवावं, त्यांना काय खायला द्यावं ही सगळी माहिती आधी असणं आवश्यक आहे.

या कर्जासाठी स्थानिक भागात कोणाला संपर्क कराल?

ही योजना राबवण्यासाठी राज्य सरकार नोडल एजन्सी असेल. ऑनलाईन जरी अर्ज केला तरी तुमचे अर्ज याच एजन्सीव्दारे बँकांपर्यंत जातील.

अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या पशुसंवर्धन

अधिकाऱ्याला संपर्क करू शकता. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी त्यांची मदत घेऊ शकता.”

Leave a Comment