सगेसोयरे अध्यादेशाची जोपर्यंत सरकार अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत आमदार खासदार व सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांनी आमच्या दारात येऊ नये याची नोंद घ्यावी
अन्यथा अपमानित करण्यात येईल
सकल मराठा समाज धाराशिव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी आज मनोज जरांगे यांच्याकडे मराठा ओबीसी आरक्षणाचा नवा अध्यादेश सुपूर्द केला आहे. यावेळी लाखो मराठा आंदोलकांनी आनंद साजरा केला. पण तरीदेखील सरकारच्या अध्यादेशात नेमकं काय आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याच अध्यादेशात नेमकं काय म्हटलं आहे त्याची जशीच्या तशी माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.