मोठी बातमी! मराठा आरक्षणाविरोधात हायकोर्टात याचिका

Table of Contents

मोठी बातमी! मराठा आरक्षणाविरोधात हायकोर्टात याचिका

 https://sarkarisevaa.com/maratha-reservat…ातमी-मराठा-आरक्ष/

Maratha Reservation Latest Update: मराठा आरक्षणासाठी एके दिवशी मनोज जरंगे पाटील झाले आक्रमक, मराठा आरक्षणाचा मुद्दा हायकोर्टात पोहोचला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लवकरच हायकोर्टात सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दिवाणी रिट याचिका दाखल करण्यात आली आहे.

 

मराठा आरक्षणाचा वाद उच्च न्यायालयात

राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या १० टक्के आरक्षणाबाबत सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. डॉ. राज्य सरकारने दिलेल्या १० टक्के मराठा आरक्षणाला जयश्री पाटील यांनी आव्हान दिले आहे. 27 फेब्रुवारी रोजी रोस्टर पद्धतीतील बदलालाही आव्हान देण्यात आले आहे.

                                    Maratha Reservation Latest Update : एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत असताना आता मराठा आरक्षणाचा वाद हायकोर्टात पोहोचला आहे. उच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर लवकरच सुनावणी पार पडणार आहे. मराठा आरक्षणाविरोधात मुंबईउच्च न्यायालयात सदावर्तेंकडून दिवाणी रिट याचिका दाखल करण्यात आली आहे.

याचिकेत अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत

आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायाधीश सुनील शुक्रे यांची नियुक्ती चुकीची असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांना सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींपेक्षा जास्त वेतन दिले जाते, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

याप्रकरणी विनोद पाटील यांच्यावतीने उच्च न्यायालयात आरक्षणाच्या समर्थनार्थ कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे यावेळी राज्य सरकार कायद्याच्या कक्षेत राहून आरक्षण देण्याचा दावा करत आहे. लवकरच उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा लढा सुरू होणार असून त्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

मोदींनी फडणवीसांना थांबवावे, अन्यथा आम्हाला नाईलाजाने न्यायालयात जावे लागेल; जरांगेंचा इशारा

Manoj jarange : फडणवीस साहेब आमचे मराठे अमच्याच अंगावर घालू नका, मराठ्यांवर चाल करून येऊ नका, पूर्वी चाल करायचे आता तसे करू नका असे जरांगे म्हणाले.

आताच का एसआयटी चौकशीचा निर्णय झाला. कारण मी सरकारने दिलेले १० टक्के आरक्षण नाकारले आहे. यामुळे एसआयटीची स्थापन करण्यात आली आहे. राजकीय आरक्षण आम्ही मागत नाही
तडजोडीला तयार झाले आहेत. त्यांनी राज्य सरकारने दिलेले दहा टक्के आरक्षण घेण्याची तयारी दर्शवली आहे. परंतु त्यासाठी एक अट ठेवली आहे. राज्य सरकारने नुकतेच मराठा समाजासाठी ‘एससीबीसी’ आरक्षण दिले आहे. आधी हे आरक्षण मान्य नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली होती. आपणास ओबीसीमधून आरक्षण हवे असल्याचे त्यांनी म्हटले होते. आता मात्र ‘एससीबीसी’चे दहा टक्के आरक्षण घेण्याची तयारी मनोज जरांगे यांनी दर्शवली आहे. परंतु हे दहा टक्के आरक्षण एकूण आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या आत घेतले पाहिजे, अशी अट मनोज जरांगे यांनी घातली आहे.

आधी एसआयटी नको, आता एसआयटी बनवली

फडणवीस यांचा डाव यशस्वी होत नाही तोवर लढणार आहे. पावसाळी अधिवेशन सुरू होते तेव्हा एसआयटी चौकशीची मागणी झाली. त्यावेळी फडणवीस यांनी म्हटले पोलिसांचा रिपोर्ट आला आहे. त्यात एसआयटी स्थापन करायची गरज नाही, असे म्हटले होते. मग आताच का एसआयटी चौकशीचा निर्णय झाला. कारण मी सरकारने दिलेले १० टक्के आरक्षण नाकारले आहे. यामुळे एसआयटीची स्थापन करण्यात आली आहे.राजकीय आरक्षण आम्ही मागत नाही. त्यासाठी आम्ही बोलत नाही. परंतु ओबीसीमध्ये जे फायदे आहेत, ते आम्हाला मिळाले पाहिजे.
एका अधिवेशनात बोलता अधिवेशनात एसआयटी चौकशी नको. दुसऱ्या अधिवेशनात चौकशी लावण्याचे आदेश देता. न्यायालय सांगते शांततेत आंदोलन करा. मग आम्ही शांततेत आंदोलन केले. मात्र गुन्हे दाखल केले जात आहे. खुन्नस दाखवली जात आहे. तुम्ही फुगे फोड्याची बंदूक दाखवता. मात्र मराठे घाबरत नाही, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

मग तुम्हाला ‘अहो जाओ’ …

अरे करे केलं म्हणालो, अशी टीका माझ्यावर झाली. मग अहो जाओ केल्यानंतर सगे सोयऱ्याची मागणी पूर्ण करणार का? मग रोज अहो जाओ करतो. मराठ्यांना सांगतो यांना अहो जाओ करा. एकनाथ शिंदे यांच्यावर आमचा विश्वास आहे. त्यांच्याकडून अपेक्षाही आहे. पण त्यांनीही समाजाची नाराजीची लाट ओढून घेऊ नये, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
आनंदराज आंबेडकर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे सांगितले. त्यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले, त्यांची भावना समाजाच्या प्रती बरोबर आहेत. परंतु सध्या ज्वलंत मुद्दा असताना राजकीय निर्णय नको. माझा तो मार्ग नाही. माझ्यासमोर ज्वलंत मुद्दा आरक्षण आहे.

घाई गडबड नाहीच, निर्णय घ्या, एका रात्रीतच… मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला सल्ला काय?

उद्या आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. दुपारी 12 वाजता अंतरवालीत बैठक आहे. शक्यतो सर्वांनीच यावं. उद्या निर्णायक बैठक होणार आहे. निर्णय घेण्याशिवाय पर्याय नाही. पोरांना न्याय देण्यासाठी गत्यंतर नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. सरकारने दिलेल्या आरक्षणाचं स्वागतच आहे. पण आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवं आहे. ते आमच्या हक्काचं आहे, असं जरांगे यांनी म्हटलंय.

 

Leave a Comment