अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

Table of Contents

                                              अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना: महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील जे तरुण/तरुणी स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली एक महत्वाची अशी योजना आहे.
भारत हा एक जास्त तरुण लोकसंख्या असलेला देश आहे तसेच एकूण लोकसंख्येच्या 54 टक्के लोकसंख्या हि वय वर्षे 25 च्या आतील आहे. म्हणून या तरुण वर्गास कुशल बनविणे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुशल मनुष्यबळाची गरज भागविणे व या उत्पादन क्षमता वयोगटातील उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगार करण्यास सक्षम करून त्यांचे जिवनमान उंचावण्याच्या दृष्टीने तसेच राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील उद्योजक बनू इच्छिणाऱ्या व तशी क्षमता असलेल्या तरुण वर्गाला आर्थिक सहाय्य्य पुरविण्याच्या दृष्टीने अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेची सुरुवात करण्यात आली
या  योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सुशिक्षित कुशल तरुणांना स्वतःचा नवीन उद्योग सुरु करण्यासाठी किंवा सुरु असलेल्या व्यवसायाची वाढ करण्यासाठी 10 ते 50 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज पुरवठा करण्यात येतो.
महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाच्यावतीने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ ची स्थापना करण्यात आली. राज्यातील बेरोजगारी बघता मराठा समाजातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे त्यांना व्यवसायामध्ये उभारी घेता यावी व उद्योग क्षेत्रात राज्याचा विकास व्हावा यासाठी आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेची सुरुवात करण्यात आली.
या योजनेअंतर्गत राज्यातील युवकांना अत्यंत सोप्या पद्धतीने व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेअंतर्गत महामंडळाचे कर्ज घेतल्यास व्याज महामंडळ भरते यामुळे युवकांना व्यवसाय उभारणीसाठी दिलासा मिळतो. मराठा समाजातील युवकांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.
सुरुवातीच्या काळात महामंडळाचे कर्ज मिळविण्यासाठी युवकांना खुप साऱ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. बँका प्रतिसाद देत नसल्याने युवकांनी कर्जासाठी केलेले अर्ज निकाली निघत नव्हते. तसेच अनुदान स्वरूपात योजना नसल्याने युवक कर्ज घेण्यास पुढे येते नव्हते. मात्र महामंडळाला उभारी देण्यासाठी शासनाने उपाययोजना केली आहे. [अण्णासाहेब पाटील कर्ज योजना]

                                       

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत खालील प्रमाणे तीन योजना राबविल्या जातात

1. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
2. गट कर्ज व्याज परतावा योजना
3. गट प्रकल्प कर्ज योजना
ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील व्यक्तींना 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मंजूर केले जाते तसेच लाभार्थ्याने कर्जाचे हफ्ते वेळेत भरल्यास त्या हफ्त्याच्या व्याजाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या साहाय्याने जमा करण्यात येते.
या योजनेअंतर्गत दिव्यांगांसाठी 4 टक्के निधी राखीव ठेवण्यात येतो.
गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत 10 लाख ते 50 लाखांपर्यंत कर्ज देण्यात येते व कर्जाचा परतफेड कालावधी 5 वर्षासाठी निर्धारित केले गेलेला आहे. या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या मागास घटकातील उमेदवारांच्या बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी, LLP FPO अशा शासन प्रमाणित संस्थांना बँकेतर्फे स्वयंरोजगार उद्योग उभारण्यासाठी बिनव्याजी कर्ज दिले जाते. [अण्णासाहेब पाटील कर्ज योजना]

वाचकांना विनंती

आम्ही आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेची संपूर्ण माहिती सविस्तर दिली आहे त्यामुळे आमचे हे आर्टिकल तुम्ही शेवट पर्यंत वाचा आणि या योजनेअंतर्गत अर्ज करून लाभ मिळावा जर तुमच्या परिसरात जे कोणी नागरिक असतील जे स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमचे हे आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचा एखादा छोटासा उद्योग सुरु करू शकतील.

योजनेचे नाव

Annasaheb Patil Loan Scheme

लाभार्थी
   महाराष्ट्र राज्यातील नागरिक
लाभ
   10 लाख ते 50 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य्य
उद्देश्य
   व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक सहाय्य्य करणे
अर्ज करण्याची पद्धत
  ऑनलाईन

             अण्णासाहेब पाटील कर्ज योजना चे उद्दिष्ट

 1. महाराष्ट्र राज्यातील तरुणांना त्यांचा स्वतःच्या नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी तसेच सुरु असलेल्या व्यवसायाची वाढ करण्यासाठी अण्णासाहेब पाटील लोन योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करून देण्याचा उद्देश्य आहे.
 2. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकांपर्यंत विशेषकरून बेरोजगार तरुणांपर्यंत आर्थिक सहाय्य्य पोहचवून त्यांना नवीन उद्योग सुरु करण्यासाठी सक्षम बनविणे.
 3. योजना राबवून रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
 4. आर्थिकदृष्ट्या मागास घटकांचा सामाजिक विकास घडवून आणणे.
 5. या योजनेअंतर्गत नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे
 6. योजनेअंतर्गत नागरिकांचे जीवनमान सुधारणे.
 7. नागरिकांना स्वरोजगारासाठी सशक्त तसेच आत्मनिर्भर बनविणे.
 8. नागरिकांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी आवश्यक पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये तसेच कोणाकडून जास्त व्याज दराने पैसे घेण्याची आवश्यकता भासू नये.
 9. राज्यातील बेरोजगारी संपवून राज्यात नवे उद्योग सुरु करणे. [अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

 1.                                                            

             अण्णाभाऊ पाटील महामंडळ कर्ज योजना वैशिष्ट्ये

  • ही योजना महाराष्ट्र सरकार ने सुरु केली आहे
  • या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील कोणत्याची श्रेणीचा उमेदवार अर्ज करून लाभ प्राप्त करू शकतो.
  • या योजनेला ऑनलाईन करण्यात आले आहे त्यामुळे अर्ज करण्यासाठी उमेदवाराला कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज  नाही अर्जदार घरी बसून स्वतःच्या मोबाईल च्या साहाय्याने अर्ज करू शकतो त्यामुळे अर्जदाराचा वेळ व पैसे यांची बचत होते.
  • या योजनेअंतर्गत अर्जदार अर्ज केल्यापासून ते कर्ज मिळेपर्यंत अर्जाची स्थिती आपल्या मोबाईल च्या माध्यमातून वेळोवेळी बघू शकतो.
  • या योजनेला ऑनलाईन केले गेले असल्यामुळे या योजनेत पारदर्शकता निर्माण होण्यास मदत होते व योग्य गरजू लाभार्थ्यांपर्यंत कर्ज पुरविले जाते. [अण्णासाहेब पाटील कर्ज योजना]
  • आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी आवश्यक पात्रता
   • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा नागरिक असणे आवश्यक आहे.
   • उमेदवाराच्या वयोमर्यादेची अट पुरुषांकरिता जास्तीत जास्त 50 वर्षे तर महिलांकरिता जास्तीत जास्त 55 वर्षे असेल. [अण्णासाहेब पाटील कर्ज योजना]
   • आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजनेच्या अटी
   • सादर योजनेअंतर्गत लाभार्थ्याने महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
   • अक्षम मापदंडाच्या अंतर्गत अर्ज करताना अपंगत्व प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
   • एका व्यक्तीला फक्त एकदाच योजनेचा लाभ घेता येऊ शकेल.
   • दिव्यांगांकरिता अर्ज दाखल करत असल्यास दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
   • योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जदारास शासनाने दिलेलाच जातीचा दाखला, पॅन कार्ड, रेशनकार्डची प्रत (पाठपोट कुटुंब सदस्यांची नावे असलेली बाजू) अपलोड करणे अनिवार्य आहे.
   • व्यावसायिक वाहनांसाठी कर्ज घेतले असल्यास कर्ज फेडीसाठीचा EMI हा प्रति माहे असणे अनिवार्य आहे.
   • जर लाभार्थ्याने मध्येच नियमित कर्जाची परतफेड केली नाही तर त्यास व्याज परतावा दिला जाणार नाही.
   • उद्योग आधाराची प्रत अपलोड करणे अनिवार्य आहे.
   • अर्जदार कोणत्याची बँकेचा थकबाकीदार नसावा.
   • बँक खाते आधार कार्डसोबत लिंक असणे आवश्यक आहे.
   • योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने सरकारच्या आधिकारीक वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
   • उमेदवाराने कर्ज प्रकरण हे सर्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली अथवा तत्सम संगणक प्रणालीद्वारे प्रकरण हाताळण्यास सक्षम असलेल्या बँकेत केलेले असावे.
   • गट प्रकल्प योजनेअंतर्गत किमान एक भागीदार / उमेदवाराची किमान शैक्षणिक अर्हता इयत्ता १०वी उत्तीर्ण असावी.
   • गट प्रकल्प कर्ज योजनेअंतर्गत गटाचे भागीदार गटाच्या बँक खात्यात गटाचा हिस्सा म्हणून प्रकल्प किमतीच्या १०% रक्कम महामंडळाचा हिस्सा वाटप करण्यापूर्वी जमा करणे आवश्यक आहे. [अण्णासाहेब पाटील कर्ज योजना]
   • अण्णासाहेब पाटील कर्ज योजना महत्वाचे बदल

  •         सर्व महिला बचत गटांना महामंडळाच्या गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत (IR – II) असलेली जास्तीत जास्त वयाची अट रद्द करण्यात आली आहे.
  •          शासन मान्य कोणताही गट ज्यांचे सदस्य 100 टक्के शेतकरी वर्गातील असतील व त्यांना शेतीसंबंधित व्यवसाय सुरु करावयाचे असतील तर अशा गटांतील सदस्यांकरिता कमाल वय           (45 वर्षे) मर्यादेची अट असणार नाही.
  •         गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II ) अंतर्गत या अगोदर बँक कर्ज मर्यादेची रक्कम किमान 10 लाख ते कमाल 50 लाखांची होती हि अट शिथिल करून सुधारित बँक कर्ज मर्यादा            जास्तीत जास्त 50 लाख करण्यात आली आहे.
  •           लाभार्थ्याने ऑनलाईन पोर्टल वर उद्योग सुरू असण्याचे किमान 3 फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. [अण्णासाहेब पाटील कर्ज योजना]
  •          उमेदवाराची नाव नोंदणी

  • उमेदवारांनी शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज सादर करणे बंधनकारक असेल.
  • प्रस्ताव सादर केल्यावर दिलेल्या अटी व शर्तीनुसार प्रस्ताव पात्र असल्यास उमेदवारांस संगणीकृत सशर्त हेतुपत्र (Letter of Intent ) मंजुरीपत्र दिले जाईल उमेदवाराने या आधारे बँकेकडून प्रकरणावर कर्ज मंजूर करून घ्यावे. [अण्णासाहेब पाटील कर्ज योजना]
  •                                                          

  • आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचे लाभ

   • आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ राज्यातील होतकरू तरुणांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी तसेच सुरु असलेल्या व्यवसायाला चालना देण्यासाठी 10 लाखांपर्यंत कर्ज पुरविले जाते.
   • सदर कर्जावरील व्याजाची परतफेड आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळामार्फत केली जाते.
   • आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत बिनव्याजी कर्ज पुरविले जाते.
   • आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे अशा व्यक्तीला 10 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
   • या योजनेअंतर्गत लाभार्थ्याने वेळेत कर्जाचे हफ्ते भरल्यास त्यातील व्याजाची रक्कम (12 टक्के) लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दरमहा जमा करण्यात येते. [अण्णासाहेब पाटील कर्ज योजना]
   • आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेच्या महत्वपूर्ण बाबी

    • या योजनेअंतर्गत सुरु करण्यात येणार व्यवसाय / प्रकल्प हा पूर्णपणे महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.
    • लाभार्थ्यांद्वारे सुरु करण्यात येणाऱ्या उद्योगात कृषी संलग्न व पारंपरिक उपक्रम, लघु व मध्यम उद्योग, उत्पादन, व्यापार व विक्री आणि सेवा क्षेत्र असावीत.
    • एकाच कुटुंबातील 2 किंवा अधिक व्यक्तीना सहकर्जदार म्हणून समावेश करण्यात येईल.
    • जर लाभार्थ्याने कर्जाच्या हफ्त्याची परतफेड केली नाही तर अशा परिस्थितीत त्यांना व्याजाचा परतावा केला जाणार नाही
    • योजनेचे सर्वसाधारण सनियंत्रण महामंडळामार्फत केले जाईल. [अण्णासाहेब पाटील कर्ज योजना]
  • आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचे कर्जाच्या व्याज रक्कमेचा परतावा

   • उमेदवाराने वेळेत कर्जाचे हफ्ते भरल्यास हफ्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम (12 टक्के प्रमाणे) त्याच्या आधार संलग्न बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. [अण्णासाहेब पाटील कर्ज योजना]
   • गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत खालील प्रकारचे गट पात्र असतील

    • शासनमान्य बचत गट (इतर कोणत्याही शासकीय योजनेत मान्य असलेले)
    • भागीदारी संस्था (निबंधक,महाराष्ट्र राज्य,भागीदारी संस्था,मुंबई यांनी प्राधिकृत केलेले)
    • सहकारी संस्था (जिल्हा उपनिबंधक यांनी प्राधिकृत केलेले)
    • कंपनी (कंपनी कायदा 2013 च्या Web Portal नुसार)
   • आवश्यक करारपत्रे
    • भागीदारी संस्थेतर्फे / सर्व भागीदार आणि महामंडळ यातील करार (शासनाने निश्चित केलेल्या दराच्या स्टॅम्प पेपरवर)
    • लाभार्थ्यास कर्ज रक्कम प्राप्त झाल्याची पोच पावती
    • कर्ज वसुलीसाठी आगाऊ धनादेश
    • अर्जदार गट/संस्थेच्या संबंधित बँक खात्यात गट/संस्था सहभागाची 10 टक्के रक्कम जमा असल्याबाबत बँक खात्याच्या पासबुकची छायांकित प्रत
    • संबंधित व्यवसायाकरिता आवश्यक परवान्याची प्रत प्रकल्पाच्या किमतीत अंतर्भूत असलेल्या यंत्रसामुग्री / साधनसामुग्रीचे दरपत्रक
    • व्यवसाय सुरु करण्याचा जागे संदर्भातील दस्तऐवज (उदा.करारनामा / भाडेपावती / ना हरकत प्रमाणपत्र)
    • जागेचा 7/12 उतारा,स्थावर जंगम मालमत्ता धारकाचे मूल्यांकन / PR Card / नमुना – 8अ मूल्यांक देण्यात येणाऱ्या कर्ज रक्कमेच्या पेक्षा अधिक असणे आवश्यक
    • हायपोथिकेशन डिड, नोंदणीकृत गहाणखत, शुअरीटी बॉंड, जनरल करारनामा, रक्कम पोचपावती, वचनचिट्ठी
   • वित्तीय सहाय्याची परतफेड

    • कर्जाची वसुली हि कर्जाची रक्कम जमा झाल्यापासून 6 महिने पूर्ण झाल्यानंतर सातव्या महिन्यापासून सुरु करण्यात येईल.
    • गट / संस्थेने सदर वित्तीय सहाय्याची परतफेड सात वर्षात (84 महिने) करावयाची आहे. [अण्णासाहेब पाटील कर्ज योजना]
    • दंडनीय कार्यवाही

     • लाभार्थ्यांकडून वित्तीय सहाय्याची नियमित परतफेड होत नसल्यास त्याचे विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
     • आवश्यक असल्यास वित्तीय सहाय्याची परतफेड करण्यास टाळाटाळ करणाऱ्या संस्थेवर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत न्यायालयीन कार्यवाही करण्यात येईल व सदर कार्यवाहीचा खर्च संबंधित संस्थेकडून वसूल केला जाईल.
     • गटाने कर्जाची रक्कम न फेडल्यास महामंडळाच्या नावे तारण असलेल्या मालमत्तेद्वारे वसुली अथवा कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
     • थकीत कर्ज रक्कमेवर 4% अधिकचे दंडनीय व्याज आकारण्यात येईल. [अण्णासाहेब पाटील कर्ज योजना]
     • आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत समाविष्ट्य बँकांची यादी

      • सारस्वत को-ऑप. बँक मर्यादित
      • लोकविकास नागरी सह. बँक लि. औरंगाबाद
      • श्री. विरशैव को-ऑपरेटीव्ह बँक मर्या. कोल्हापूर
      • श्री. वारणा सहकारी बँक लिमि.वारणानगर
      • श्री. महालक्ष्मी को-ऑपरेटिव्ह को-ऑपरेटिव्ह बँक
      • कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लिमि.
      • श्री.आदिनाथ को-ऑपरेटिव्ह बँक लिमि. इचलकरंजी
      • दि नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक लिमि. सिंधुदूर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमि.सिंधुदूर्ग.
      • देवगिरी नगरी सहकारी बँक, औरंगाबाद
      • द चिखली अर्बन को.ऑपरेटीव्ह बँक लिमि.चिखली,बुलढाणा
      • राजारामबापु सहकारी बँक लिमि. पेठ, सांगली
      • ठाणे जनता सहकारी बँक, ठाणे
      • दि पनवेल को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक मर्या, पनवेल
      • हुतात्मा सहकारी बैंक मर्या, वाळवा
      • राजे विक्रम सिंह घाटगे को-ऑप.बँक लि.कागल
      • चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक मर्यादित,चंद्रपुर
      • राजापूर अर्बन को-ऑप. बँक लि. राजपूर
      • नाशिक जिल्हा महिला सहकारी बँक मर्यादित,
      • यवतमाळ अर्बन को-ऑप. बँक मर्यादित
      • शरद नागरी सहकारी बँक मर्यादित
      • लोकमंगल को-ऑप.बँक मर्यादित सोलापुर
      • प्रियदर्शनी महिला नागरी सहकारी बँक
      • पलूस सहकारी बँक पलूस
      • रामेश्वर को.ऑप.बँक मर्यादित
      • रेंडल सहकारी बँक मर्यादित, रेंडल
      • कुरूंदवाड अर्बन को-ऑप. बँक मर्यादित, कुरूंदवाड
      • श्री. अंबरनाथ जयहिंद को-ऑप. बँक
      • जनता सहकारी बँक अमरावती
      • दि अमरावती मर्चट को-ऑप.बँक मर्यादित
      • अभिनव अर्बन को-ऑप. बँक मर्यादित
      • जिल्हा मध्यवर्ती बँक मुंबई
      • अरिहंत को-ऑप बँक
      • दि कराड अर्बन को-ऑप बँक
      • विदर्भ मर्चेट को-ऑप.बँक मर्यादित, हिंगणघाट
      • दिव्यंकटेश्वरा सह.बँक लि. इचलकरंजी
      • सेंट्रल को. ऑप. बँक लि. कोल्हापूर
      • सांगली अर्बन को.-आपरेटीव्ह बँक लिमि., सांगली
      • दि भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक
      • गोदावरी अर्बन बँक
      • श्री. नारायण गुरू को. ऑप. बँक लि.
      • श्रीकृष्ण को.ऑप.बँक लि.
      • नागपुर नागरी सहकारी बँक
      • सातार सहकारी बँक
      • दिहस्ती को.ऑप. बँक लिमी.
      • दि बुलडाणा जिल्हा केंद्रिय सह. बँक म. बुलडणा
      • अनुराधा अर्बन को-ऑप.बँक लिमी.
      • जनता सहकारी बँक लिमी. गोंदिया
      • निशीगंधा सहकारी बँक
      • महाराष्ट्र नागरी सहकारी बँक मर्या. लातूर
      • सातारा जिल्हा मध्यवर्ती सह. बँक लि. सातारा
      • येस बँक लि.Ves Bank LTD.)
      • रायगड सहकारी बैंक लिमिटेड
      • https://sarkarisevaa.com/रमाई-घरकुल-योजना/
      • https://sarkarisevaa.com/प्रधानमंत्री/
       प्रधानमंत्री किसान सन्मान निधी
      • People Search Query: annasaheb patil loan scheme information in marathi, Annasaheb Patil Aarthik Vikas Mahamandal Yojana, Annasaheb Patil Mahamandal Loan Scheme Details, Annasaheb Patil, Annasaheb Patil Mahamandal Loan Process, Annasaheb Patil Yojana, Mahaswayam, अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना, अण्णासाहेब पाटील वाहन कर्ज योजना, अण्णासाहेब पाटील कर्ज योजना माहिती

Leave a Comment